Jump to content

RTI International

  • entries
    11
  • comments
    0
  • views
    5,233

माहितीचा अधिकार हा सुद्धा मूलभूत अधिकार : नवीन अग्रवाल 


Agrawal Naveen

1,785 views

माहितीचा अधिकार हा सुद्धा मूलभूत अधिकार : नवीन अग्रवाल


प्रादेशिक कामगार संस्थे मध्ये माहितीचा अधिकार विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित

नागपुर।  भारतीय घटनेतील कलम १९ (१) मध्ये भाषण तसेच अभिव्यक्तीचा स्वातंत्राच्या अधिकार देशातील नागरिकांना प्रदान करण्यात आलेला आहे, परंतु जर लोकांना माहिती प्राप्त होत नसेल तर ते आपले मत कसे व्यक्त करणार, यासाठी भाषण आणि अभिव्यक्तीच्या  स्वातंत्र्यामध्येच  माहिती अधिकार अंतर्भूत आहे. ज्या प्रकारे अभिव्यक्तीची स्वतंत्रता हा एक मूलभूत हक्क आहे त्याचप्रकारे माहितीचा अधिकार हा सुद्धा मूलभूत अधिकार आहे, सर्वोच्च न्यायालयानेही आपल्या निर्णयांमध्ये हे स्पष्ट केलेले आहे. उक्त उदगार  दादा रामचंद बाखरू सिंधु महाविद्यालय चे रजिस्ट्रार एवं सूचना अधिकार केंद्र, यशदा, पुणे येथील अतिथि व्याख्याता श्री नवीन महेशकुमार अग्रवाल यांचे आहे. महाराष्ट्र शासना अंतर्गत प्रादेशिक कामगार संस्थेमध्ये माहिती अधिकार या विषयावर आयोजित  एक दिवसीय कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करत असताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच प्रादेशिक कामगार संस्थेतील पाठयक्रम समानव्यक प्राध्यापक श्री प्रकाश निमजे यांनी माहिती अधिकार या बद्दल समाजामध्ये जनजागृतीची आवश्यकता वर जोर दिला. मास्टर ऑफ लेबर स्टडीजचा विद्यार्थ्यांसाठी आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन कार्यक्रम अध्यक्ष प्रकाश निमजे, प्रमुख पाहुणे नवीन अग्रवाल तसेच विशेष अतिथी नेहा गायकवाड यांनी संयुक्त रूपाने केले. कार्यशाळेमध्ये माहिती अधिकाराचा उपयोग समाजहितासाठी कशाप्रकारे करता येईल तसेच कोणती माहिती प्रदान केली जाऊ शकते अथवा कोणती नाही, याबद्दल विस्तारपूर्वक समजविण्यात आले.
कार्यशाळेचा यशप्राप्ती हेतु तन्वी देशपांडे, शर्मिला कुंटिया, तुषार जैतगुड़े, कृष्णकांत मिश्रा, रक्षित बनसोड़, स्वपनील पाटिल, संदीप माने, मुग्धा देशपांडे, विनय सावरकर, स्नेहल पालांदुरकर, सुकन्या डोरले, राधिका जोशी, स्नेहल नखाते व  प्रांजल मानवटकर यांनी अथक परिश्रम केले. सूत्र संचालन सोनाली भगत तसेच आभार प्रदर्शन सिद्धार्थ मेश्राम ने केले.

01[4-6]=17 COPYS.JPG

0 Comments


Recommended Comments

There are no comments to display.

Guest
Add a comment...

×   Pasted as rich text.   Paste as plain text instead

  Only 75 emoji are allowed.

×   Your link has been automatically embedded.   Display as a link instead

×   Your previous content has been restored.   Clear editor

×   You cannot paste images directly. Upload or insert images from URL.

×
×
  • Create New...

Important Information

By using this site, you agree to our Terms of Use & Privacy Policy